आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sajida Mubarak Al Rishawi To Be Freed By Jordan In Isis Prisoner Deal

जपानी ओलिसाचा जीव वाचवण्‍यासाठी दहशतवाद्याची तुरुंगातून होणार सुटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अम्मान - जॉर्डनच्या तुरुंगातून महिला दहशतवादी साजिदा मुबारक अल-रिशावीची सुटका करण्‍यात येणार आहे. नुकतेच मिळालेल्या वृत्तानुसार, जॉर्डन सरकार आणि इस्लामिक स्टेटमध्‍ये झालेल्या करारानुसार हा निर्णय घेण्‍यात आला आहे.जपान सरकारने जॉर्डनकडे मदतीची विनंती केली होती.साजिदा अल-रिशावी या दहशतवादी महिलेला आत्मघाती हल्ला करण्‍याचा प्रयत्न करत असताना अटक करण्‍यात आली होती.

अल जजीराच्या वृत्तानुसार, अम्मानमध्‍ये जपानचे परराष्‍ट्र मंत्र्यांनी सांगितले आहे, की साज‍िदाला पुढील काही तासांमध्‍ये इस्लामिक स्टेटला सोपवण्‍यात येणार आहे. काही तासांमध्‍ये चांगली बातमी मिळेल, असे परराष्‍ट्र मंत्री याशूहिदे नाकायामाने म्हटले आहे.

इस्लामिक स्टेटने ओलिस ठेवलेले पत्रकार केन्जी गोटोचा व्ह‍िडिओ प्रसिध्‍द केल्यानंतर जपान आणि जॉर्डनचे अधिका-यांच्या दरम्यान चर्चा चालू होती. व्हिडिओत साजिदा अल-र‍िशावीला 24 तासांमध्‍ये तुरुंगातून सुटका करण्‍यात यावी. अन्यथा जपानी पत्रकार केंजी गोटो आणि जॉर्डनचा वैमानिक मुआद अल कसाबेह यांचा शिरच्छेद करण्‍यात येईल, अशी धमकी दिली आहे.
कोण आहे साजिदा अल-रिशावी?
साजिदा ही इराकचे तत्कालीन अल-काईदा नेता अबू मुसाब अल झरकावीची बहीण आहे. झरकावी 2006 साली अमेरिकेच्या लष्‍करी कारवाईत मारला गेला आहे. नोव्हेंबर 2005 मध्‍ये जॉर्डनची राजधानी अम्मान येथे तीन पंचतारांकित हॉटेलमध्‍ये अनेक बॉम्बस्फोट घडवण्‍यात आले होते. यात 60 लोक मारली गेली. या घटनेस पूर्णत्व देणा-यात दहशतवाद्यांच्या गटात रिशावीचाही समावेश होता.तिला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने साजिदा अल-रिशावीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे.