आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salaman Khurshid Comment On Narendra Modi At New Yark

मोदींना गावंढळ महिलांचा तिटकारा -सलमान खुर्शीद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर गावंढळ महिलेवरून केलेल्या टीकेला परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मोदींना गावंढळ महिलांचा तिटकारा आहे. वस्तुस्थिती जाणून न घेता मोदींकडून पोपटपंची केली जात असल्याचा आरोप
त्यांनी केला. खुर्शीद म्हणाले, खेडूत महिला असण्यात गैर काहीच नाही, मोदी ग्रामीण भागातील वास्तवापासून दूर आहेत. मोदींना खेडूत महिला आवडत नाहीत. खेडूत महिला या शब्दाचा आपण तिरस्कार करतो हेही त्यांना समजत नाही.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सिंग यांचा उल्लेख गावंढळ महिला असा करत अवमान केल्याचा दावा मोदी यांनी दिल्लीतील रविवारच्या सभेत केला होता. यावर खुर्शीद यांनी ही प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानी पत्रकारांनी शरीफ यांच्या वक्तव्यास सुरुवातीस दुजोरा दिला होता, त्यानंतर त्यांनी माघार घेतली. ज्यांना भारतीय राजकारणाचा अनुभव नाही, अशा पोरासोरांनी दिलेला सल्ला मोदी ऐकतात. यातूनच त्यांनी सांगितलेल्या गोष्टीची ते पोपटपंची करतात. परंतु त्यांचा कुठलाच आरोप वस्तुस्थितीला धरून नसतो, असा आरोप खुर्शीद यांनी केला.

सिंग यांनी पाकची तक्रार केली नाही
न्यूयॉर्क- पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ओबामांसोबत चर्चेत सीमेपलीकडील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता, तो काही तक्रारीचा सूर नव्हता, असे खुर्शीद यांनी म्हटले आहे.

सायबर विश्वात शाब्दिक युद्ध
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांवर टीका केल्यानंतर सोमवारी सायबर विश्वात शाब्दिक युद्ध पेटले आहे. काँग्रेस व भाजप समर्थक ‘फेकूअलर्ट’ आणि ‘मोदीफायदिल्ली’ हॅशटॅगच्या माध्यमातून आपली बाजू मांडत आहेत. सिंग यांचा उल्लेख खेडूत महिला असा केल्यामुळे ट्विटरवर मोदी यांना ग्रामीण महिलेच्या वेशभूषेत दाखवण्यात आले आहे. काँग्रेसचे टीव्हीवरील पॅनलिस्ट संजय झा यांनी भाजपला बिग जॉक पार्टी संबोधले.

देशाला वास्तववादी पीएम हवा
कोलकाता- देश स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे आपल्याला अर्थतज्ज्ञ नव्हे, तर वास्तववादी पंतप्रधान हवा आहे, असे मत भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. सिंग अर्थतज्ज्ञ आहेत, वाजपेयी अर्थतज्ज्ञ नव्हते. असे असताना तुम्ही यूपीए व एनडीएच्या काळातील आर्थिक स्थितीची तुलना करू शकता, असे सिंह म्हणाले.