आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रश्दींची टिव टिव बंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - जयपूरमधील साहित्य महोत्सवाच्या निमित्ताने भारत दौºयावर येणार आहोत किंवा नाही याविषयी वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांनी ट्विटरवरून कमालीचे मौन बाळगले आहे. वास्तविक रश्दी हे ट्विटरवरील नियमित कॉमेंटेटर आहेत.
जयपूर येथे याच महिन्यात होणाºया साहित्य महोत्सवाचे रश्दी यांना निमंत्रण आहे, परंतु त्यांच्या आगमनाला काही संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांच्या आगमनावरून अनिश्चितता असल्याने ते ट्विटरवरून काहीतरी संकेत देतील, अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांना आहे. हा वाद सुरू झाल्यापासून त्यांच्या अकाउंटवर काहीतरी निश्चित माहिती दिली जाईल असे वाटत होते. ते नियमित कॉमेंटेटर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आगमनाची ठोस माहिती मिळेल असे वाटत असले तरी त्यांनी मात्र याविषयी मौन बाळगले आहे. आश्चर्य म्हणजे हा आठवडा सुरू झाल्यापासून त्यांच्या अकाउंटवर यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ट्विटरवरून त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नांनादेखील यश मिळू शकलेले नाही.