आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेचा घात करत आहे मीठ आणि सॉफ्ट ड्रिंक्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका सध्या एका वेगळ्याच संकटांचा सामना करत आहे. त्याच्याशी कसा मुकाबला करावा याचे उत्तर अमेरिकेला सापडलेले नाही. हे संकट आहे अन्नामधील मीठाचे जास्त प्रमाण.

अमेरिकेतील १० पैकी एक मृत्य हा अती मीठ सेवनामुळे होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. अमेरिकेत गोड खाण्यामुळे होणा-या मृत्यूच्या प्रमाणापेक्षा मीठामुळे होणा-या मृत्यूची संख्या दहा पटीने जास्त आहे. अमेरिकेत प्रोसेस् आणि हवाबंद अन्न खाण्याचे फॅड जास्त आहे आणि या पदार्थांमध्येच मीठाचे प्रमाण जास्त असते.

न्यूयॉर्कचे महापौर मायकल ब्लूमबर्ग यांनी नुकतेच अति गोड पदार्थांवर बंदी घातली आहे, त्यांच्या या निर्णयाला मोठा विरोध होत आहे. ब्लूमबर्ग यांनी १६० आउंसापेक्षा जास्त गोड असलेल्या सॉफ्ट ड्रिंक्सवर बंदी आणली आहे. मात्र, एका सर्वेक्षणातून गोड पदार्थांपेक्षा अन्नातील मीठाचे प्रमाण जास्त धोकादायक असल्याचे समोर आले आहे. या अहवालानुसार तयार अन्न पदार्थातील मीठ हेच ७० पेक्षा कमी वय असलेल्या लोकांच्या मृत्यूचे कारण आहे. हा अहवाल बोस्टन येथील प्रतिष्ठीत हावर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने सादर केला आहे. याच रिसर्च टीमने एक आठड्यांपू्र्वी सॉफ्ट ड्रिंकमधील शर्करामुळे अमेरिकेत दरवर्षी २५ हजार लोकांचा मृत्यू होत असल्याचे म्हटले होते. या आठवड्यात या टीमने वर्ष २०१० मध्ये प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल्याने जगात २३ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. जास्त मीठ खाणा-या व्यक्तींचा मृत्यू ह्रदयविकाराने झाला आहे. हावर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने सादर केलेल्या या अहवालानुसार अमेरिकेत मीठाच्या जास्त प्रमाणामुळे २.५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. गोड पदार्थांच्या सेवनाने होणा-या मृत्यूच्या प्रमाणात हा आकडा दहा पटीने जास्त आहे.