आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जपानमधील नाराहा भागात भोपाळसारख्याच समस्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळच्या युनियन कार्बाइड प्लँटच्या आसपास आज जशी स्थिती आहे, अगदी तशीच स्थिती फुकुशिमानजीकच्या नाराहा भागातील आहे. दोन वर्षांपूर्वीच्या भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या फुकुशिमा अणुभट्टीचा कचरा, किरणोत्सर्गाने प्रदूषित झालेली हजारो टन माती नाराहामध्ये साठवण्यात येत आहे. कधीकाळी आठ हजार लोकांची वस्ती असलेल्या या भागात 20 कि.मी. परिसरात लोकांना मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, अणुकचरा हळूहळू आपल्या जिवाला धोकादायक ठरतो की काय, अशी येथील लोकांना धास्ती आहे. जवळपास 30 वर्षांपूर्वी युनियन कार्बाइड दुर्घटनेनंतर कंपनी परिसरात 350 टन कचरा विखुरला होता. हाच कचरा जमिनीत गाडला जाऊन लोकांच्या आजारपणाला कारणीभूत ठरला.