Home | International | Other Country | samoa prepares to skip dec 30

जगातील दोन देशात 30 डिसेंबर दिवस उगवलाच नाही!

वृत्तसंस्था | Update - Dec 31, 2011, 02:23 AM IST

काळाचे चक्र आपल्या पद्धतीने पुढे सरकत असते ही भलेही आपली धारणा असेल, पण जगातील दोन देश असे आहेत की जेथे 30 डिसेंबर हा दिवस उगवलाच नाही.

  • samoa prepares to skip dec 30

    एपिया - काळाचे चक्र आपल्या पद्धतीने पुढे सरकत असते ही भलेही आपली धारणा असेल, पण जगातील दोन देश असे आहेत की जेथे 30 डिसेंबर हा दिवस उगवलाच नाही. 29 डिसेंबरनंतर थेट 31 डिसेंबरच आला. प्रशांत महासागरातील सामोआ आणि तोकेलो हे ते देश आहेत.
    शेजारी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडशी व्यापारी संबंध सुधारण्यासाठी आपण असे करणार असल्याचे समोआने तर मेमध्येच जाहीर करून टाकले होते. देशात 19 वर्षांनंतर हा बदल घडून आला आहे. त्या वेळी अमेरिकेशी संबंध सुधारण्यासाठी या देशाने वेळेत एका दिवसाची भर घातली होती. समोआचे पंतप्रधान तुइलेपा सेलेले यावर म्हणतात, समोआ व त्याच्या बड्या शेजा-यांमध्ये आता पाच दिवस समान असतील. न्यूझीलंड व हवाईदरम्यान हा देश वसलेला आहे. लोकसंख्या सुमारे 1 लाख 80 हजार आहे. न्यूझीलंडमध्ये अंदाजे 1 लाख 31 हजार लोक मूळ समोआचे आहेत.
    तोकेलो तीन टापूंचा मिळून बनलेला छोटेखानी देश आहे. फिजीच्या उत्तरेला आणि हवाई व ऑस्ट्रेलियाच्या मध्ये तो वसलेला आहे. तसे पाहता येथे न्यूझीलंडची सत्ता आहे. यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात तोकेलोची लोकसंख्या उणीपुरी 1,411 होती.
    हे कसे घडले - घड्याळात 29 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेचा ठोका पडताक्षणी समोआ आणि तोकेलू या देशांनी देशभरातील सर्व घड्याळांतील तारीख 31 डिसेंबर करून घेतली. आपल्या देशाची सीमाही त्यांनी इंटरनॅशनल डेटलाइनच्या दुस-या बाजूला घेतली आहे.Trending