स्पेन आपल्या सुंदर अशा वस्त्र, स्वादीष्ट खाद्य पदार्थ, आणि महोत्सव यासाठी प्रसिध्द आहे. येथील पांप्लोना येथील सॅन फर्मिन महोत्सवाला रविवारी(ता. सहा) हर्षोल्हासात प्रारंभ झाला. ‘चुपिनाझो’ अग्निबाण सोडून या महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर संगीतकाराचा जत्था गायन करत असताना उपस्थित हजारो नागरिकांनी हात उंचावून भरभरून दाद दिली. जगभरातील लोक या महोत्सवात सहभागी होतात.
अर्नेस्ट हेमिंग्वेच्या कादंबरीचा आधार
अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या 1926 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘द सन अलसो राइजेस’ या कादंबरीत बैलांच्या शर्यतींचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बैल पळवण्यात येतात. त्यात अनेक जण जखमीही होतात.
10,00000 लोक जगभरातून सहभागी होतात महोत्सवात.
1914 पासून भरवला जातो सॅन फर्मिन महोत्सव
08 दिवस चालतो हा महोत्सव