आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्यानमारमध्ये बदलाचे वारे स्यू की यांची उमेदवारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यांगून - अनेक वर्षांच्या लष्कराच्या जुलमी राजवटीनंतर म्यानमारमध्ये बदलाचे वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. नोबेल पुरस्कारविजेत्या लोकशाहीवादी नेत्या आंग सॅन स्यू की यांनी संसदेच्या आगामी पोटनिवडणुकीसाठी आज आपली उमेदवारी दाखल केली.
येत्या एक एप्रिल रोजी म्यानमार संसदेची पोटनिवडणूक होत आहे. लोकशाहीचा तोंडावळा असलेल्या सरकारसमोर ही निवडणूक म्हणजे एक आव्हानच आहे. गेल्या वषीपर्यंत स्यू की आपल्याच घरात नजरकैदेत होत्या.त्यांची सरकारने केदेतून सुटका केल्यानंतर स्यू की यांची ही पहिलीच निवडणूक आहे.यांगूनजवळील काव्हमु या ग्रामीण मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे.या ठिकाणी 2008 मध्ये नर्गिस चक्रीवादळाने वाताहत केली होती. उमेदवारी अर्ज दाखल कररणा-या राष्ट्रीय लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) या पक्षाच्या त्या पहिल्यात उमेदवार आहेत असे पक्षाचे ज्येष्ठ नेते विन हतिन यांनी सांगितले.
लष्करशाही आणि विरोधकांध्ये सुधारणाविषयक बोलणी सुरू करण्यास स्यू की यांच्या पक्षाने आधीच संमती दिली आहे.त्यानंतरच त्यांनी राजकीय आखाड्यात उतरण्यास सहमती दर्शविली. सन 2010 झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जाचक नियम असल्याचा आरोप करीत एनएलडी पक्षाने
निवडणुकीवर बहिष्कार घातला होता.यामुळे सरकारने पक्षाची मान्यताच रद्द केली होती.