आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sandal Throw On Iran's President Mahemud Ahmedinejad

इराणचे राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांच्यावर चप्पल फेकली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कैरो - इराणचे राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांचे इजिप्तच्या राजधानीत भव्य स्वागत झाले.मात्र त्यांच्या दौ-यास विरोध करणा-या निदर्शकांनी अहमदीनेजाद यांच्यावर चप्पल फेकली. इराण आणि इजिप्त यांच्यात राजकीय संबंध नाहीत.34 वर्षांनंतर इजिप्तच्या दौ-यावर येणारे ते पहिलेच इराणी नेते आहेत.

अहमदीनेजाद यांनी कै रोजवळील अल-अजहर मशीद व विद्यापीठास भेट दिली.त्यावेळी मशिदीबाहेर त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली.एका सिरियन वंशाच्या नागरिकाने अहमदीनेजाद यांना उद्देशून भ्याड असे म्हणून त्यांच्यावर चप्पल फेकली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.सिरियातील असाद राजवटीला इराणचा पाठिंबा आहे.त्यामुळे इजिप्तमधील असाद विरोधकांनी ही निदर्शने केली.