Home | International | Other Country | santa claus killing: six people

अमेरिकेत सान्ता क्लॉजने सहा नातेवाइकांना गोळ्या घातल्या

वृत्तसंस्था | Update - Dec 28, 2011, 02:53 AM IST

नाताळच्या दिवशी जगभरातील मुलांना आनंद वाटणा-या सांताक्लॉजने अमेरिकेच्या टेक्सास शहरात मात्र आपल्याच नातेवाइकांना गोळ्या घालून त्यांचे आयुष्य हिरावून घेतले

  • santa claus killing: six people

    ह्युस्टन । नाताळच्या दिवशी जगभरातील मुलांना आनंद वाटणा-या सांताक्लॉजने अमेरिकेच्या टेक्सास शहरात मात्र आपल्याच नातेवाइकांना गोळ्या घालून त्यांचे आयुष्य हिरावून घेतले व नंतर स्वत:चेही आयुष्य पविले. टेक्सासमधील डल्लास शहराच्या ग्रेपवाईन भागातील फोर्टवर्थ येथे नाताळ साजरा करण्यासाठी कुटुंबीय जमले असतानाच एका 56 वर्षीय माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार करीत सहा नातेवाइकांना गोळ्या घालून ठार मारले.त्यात तीन महिलांचा समावेश होता. नंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. मृतांचे वय 18 ते 60 दरम्यान आहे.या हत्याकांडाचे मागचे नेमके कारण समजू शकले नाही.

Trending