आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरबजीतबाबत कांगावा करणा-या पाककडून सनाउल्‍लाहवर शासकीय इतमामात अंत्‍यसंस्‍कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबाद/चंदीगढ- पाकिस्‍तानचा कैदी सनाउल्‍लाहच्‍या मृत्‍यूनंतर पाकिस्‍तानकडून कांगावा करण्‍यात येत आहे. आंतरराष्‍ट्रीय तपास संस्‍थेमार्फत या घटनेची चौकशी करण्‍याची मागणी पाकिस्‍तानने केली होती. परंतु, भारताने ही मागणी फेटाळली आहे. सनाउल्‍लहवर पाकिस्‍तानने शासकीय इतमामात अंत्यसंस्‍कार करुन त्‍याचा मृतदेह दफन केला. भारताने सरबजीतला शहिदाचा दर्जा दिल्‍यावरुन पाकिस्‍तानने नाराजी व्‍यक्त केली होती. परंतु, भारतात दहशतवादाच्‍या आरोपाखाली कैदेत असलेल्‍या सनाउल्‍लाहलावर पाकिस्‍तानने शासकीय इतमामात अंत्‍यसंस्‍कार केले. त्‍याचा काल मृतदेह विशेष विमानाने पाकिस्‍तानात पाठविण्‍यात आला होता मृतदेहासोबतच त्‍याच्‍याजवळील पवित्र कुराण आणि इतर वस्‍तूदेखी सोपविण्‍यात आल्‍या.


रुग्णालयात दाखल केले तेव्हाच सनाउल्लाह ब्रेन डेड होता. गुरुवारी त्याचे अवयव निकामी होत गेले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 52 वर्षीय सनाउल्लाहला 1999 मध्ये दहशतवादविरोधी कायद्यान्वये अटक झाली होती. त्याच्यावरील हल्लेखोर कैदी विनोदवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाकिस्‍तानने भारतातील पाकिस्‍तानी कैद्यांच्‍या सुरक्षेवरुन कांगावा केला. त्‍यानंतर भारताने पाकिस्‍तानला कडक शब्‍दात सुनावले. भारताने संयुक्त न्‍याचिक समिती स्‍थापन करण्‍यास सहमती दर्शविली आहे. तरीही पाकिस्‍तानने आंतरराष्‍ट्रीय तपास संस्‍थेमार्फत चौकशीचा हट्ट कायम ठेवला आहे. ही मागणी भारताने सपशेल फेटाळली. कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव भारताने पाकला पूर्वीच दिला आहे. भारतात 272 पाक कैदी असून, पाकमध्ये 532 भारतीय आहेत.