आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sao Paulo Helicopter Crashes Into Home, Killing Pilot

हेलिकॉप्टर घरात घुसले; पायलट ठार, अधिक जीवित हानी नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साओ पाओलो - दाट वस्ती असलेल्या ब्राझीलच्या साओ पाओलो शहरानजीकच्या एका गावात सोमवारी दुपारी एक हेलिकॉप्टर कोसळले. मागील बाजूचे इंजिन अचानक बंद झाल्यामुळे हे हेलिकॉप्टर भरकटून जारगुवा गावातील भरवस्तीत दोन घरांत घुसले. मार्सेलो स्टेला हा तरुण वैमानिक जागीच ठार झाला. तीन प्रवासी जखमी झाले; परंतु चिंचोळ्या गल्लीत कोसळूनही सुदैवाने यात फारशी जीवित हानी झाली नाही.

प्रवासी हेलिकॉप्टर
एअर टॅक्सी म्हणून वापरात असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये सात प्रवासी होते. ते सोमवारी दुपारी साओ पाओलोकडे निघाले होते. अपघाताचे नेमके कारण कळू शकले नाही. हेलिकॉप्टरचे मागील बाजूचे इंजिन अचानक बंद झाल्याने ते घरावर कोसळले, असे प्रत्यक्षदर्शी रहिवाशांनी सांगितले.