आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्‍स सुपरबगनंतर नव्‍या विषाणूचा धोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेक्‍स सुपरबगने जगभरात खळबळ उडविल्‍यानंतर आता एका नव्‍या विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. हा कोरोना व्‍हायरस असून काही वर्षांपूर्वी 'सार्स'च्‍या विषाणूप्रमाणे याचा परिणाम जाणवतो. सौदी अरबमध्‍ये आतापर्यंत 15 जणांचा या नव्‍या विषाणुमुळे मृत्‍यू झाला आहे. युरोप आणि अरब देशांमध्‍ये याचा प्रभाव जास्‍त असून हळूहळू इतर देशांमध्‍येही त्‍याचा प्रसार होऊ लागला आहे. त्‍यामुळे जागतिक आरोग्‍य संघटनेकडून याबाबत अलर्ट जारी करण्‍यात आला आहे.

जागतिक आरोग्‍य संघटनेने अलर्ट जारी करताना म्‍हटले आहे की, या विषाणूचा मनुष्‍यांमध्‍ये संसर्ग होऊ शकतो. विषाणू अतिशय घातक असून त्‍यामुळे निमोनिया किंवा किडनी निकामी होऊ शकते. संसर्ग झालेल्‍या व्‍यक्तीपासून इतरांनाही आजार होऊ शकतो. 'सार्स'प्रमाणे या विषाणमुळे होणा-या आजाराची लक्षणे आहेत.

फ्रान्‍सनेही यासंदर्भात दुजोरा दिला आहे. फ्रान्‍समध्‍ये दोन रुग्‍ण पॉझिटीव्‍ह आढळले आहेत. तर सौदी अरबमध्‍ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्‍यू झाला आहे. विषाणूचा संसर्ग झाल्‍यास वाचणे अतिशय कठीण आहे. विषाणूच्‍या प्रभावावर अतिशय संशोधन सुरु आहे.