आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बराक ओबामांची सर्वात धाकटी कन्‍या चक्‍क जांभाई देताना कॅमेरात झाली कैद!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्‍यूयॉर्क- बराक ओबामा यांनी काल अमेरिकेच्‍या राष्‍ट्रपतीपदाची चौथ्‍यांदा शपथ घेतली. शपथविधीला 8 लाखांहून अधिक नागरिकांची उपस्थिती होती. तर कोट्यवधी डोळ्यांनी हा सोहळा दुरचित्रवाणीवरुन पाहिला. जगातील सर्वात प्रभावशाली व्‍यक्ती असलेल्‍या ओबामांच्‍या भाषणाकडे जगभराचे लक्ष लागले होते. परंतु, भाषणादरम्‍यानच असा काही प्रसंग घडला की संपूर्ण जगाच्‍या नजरा ओबामांपासून हटल्‍या.

बराक ओबामांच्‍या शपथविधीला त्‍यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. ओबामांचे भाषण सुरु असतानाच त्‍यांची सर्वात लहान कन्‍या साशा चक्‍क जांभई देताना कॅमेरामध्‍ये कैद झाली. या क्षणाचे छायाचित्र सध्‍या इंटरनेटविश्‍वात धुमाकुळ घालत आहे.