आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Saudi Arab Tells Parvez Musharraf Not To Go To Pakistan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तालिबानकडून मुशर्रफ यांना ठार मारण्‍याची धमकी, आत्‍मघातकी पथक तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - सौदी अरेबियाच्या अधिकार्‍यांनी पाकिस्‍तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना मायदेशी जाऊ नका, असा सल्ला दिला आहे. तर आता पाकिस्‍तानच्‍या तालिबानने मुशर्रफ यांना ठार मारण्‍याची धमकी दिली आहे.

तालिबानने म्हटले आहे की, मुशर्रफ पाकिस्तानमध्ये पुन्हा परतल्यास त्यांना नरकात पाठविण्यात येईल. मुशर्रफ यांनी तालिबानकडे आत्‍मसमर्पण करावे, अन्‍यथा त्‍यांना ठार मारण्‍यात येईल. आत्‍मघातकी पथक त्‍यांना मारण्‍यासाठी सज्‍ज आहे, असा संदेश तालिबानकडून देण्‍यात आला आहे. तालिबानचा प्रवक्ता इहसानुल्‍ला इहसान याने एक चित्रफीत जारी करुन मुशर्रफ हेच टार्गेट राहतील, असे म्‍हटले आहे.

सौदीनेही मुशर्रफ यांना संभाव्‍य धोक्‍याचा इशारा दिला आहे. मायदेशात जाणे प्राणघातक ठरू शकते. असे सौदीने म्‍हटले आहे.

मुशर्रफ यांनी 24 मार्चला पाकिस्तानात परतण्याची घोषणा केली आहे. त्यांचा पक्ष ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल) 11 मे रोजी होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीत उतरणार आहे. सौदी अरेबियाच्या गुप्तहेरांनी मुशर्रफ यांना दुबईमध्ये धोक्याची सविस्तर माहितीदेखील दिली आहे. मुशर्रफ गेल्‍या काही वर्षांपासून दुबई आणि लंडनमध्‍ये वास्‍तव्‍यास आहेत.