आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saudi Arabia Bans Child Name Like Rama, Maya, Malika Etc

सौदी अरेबियाचा \'राम\' नावाला रामराम, माया-मल्लिकासह 50 नावांना केले बॅन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाध - सौदी अरबमध्ये आता एकही व्यक्ती त्यांच्या मुलाचे नाव राम ठेवू शकणार नाही. त्याचे कारण तेथील सरकारने हे नाव ठेवण्यावर बंदी घातली आहे. राम या नावासोबतच माया, मल्लिका यांसारख्या भारतात प्रसिद्ध असलेल्या कित्येक नावांवर सौदी अरब सरकारने बंदी घातली आहे. याशिवाय पाश्चिमात्य संस्कृतीतील काही नावांवरही त्यांनी फुली मारली आहे.
का घातली बंदी
सौदी अरेबियाच्या गृहमंत्रालयाकडून या बंदीचे समर्थन करण्यात आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही नावे देशाच्या संस्कृतीला अनुकूल नाहीत. मंत्रालयाने 50 नावांची यादी जारी करुन ही नावे देशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक भावनांना दुखावणारी असल्याचे सांगत त्यावर बंदी घातली आहे.
बंदी घालण्यात आलेली नावे ही एक तर धार्मिक भावना दुखावणारी आणि राजपरिवाराशी संबंधीत किंवा गैर-मुस्लिम आहेत. यात एक मजेशिर गोष्ट ही आहे, की बंदी घालण्यात आलेल्या नावांमध्ये एक नाव बेन्यामिन आहे, जे बेंजामिनचे मुळ अरबी रुप आहे. इस्त्राइलच्या पंतप्रधानांचे नाव बेंजामिन (नेतन्याहू) असल्यामुळे या नावावर बंदी घालण्यात आली आहे.

बंदी घातलेली नावे पुढील स्लाइडमध्ये