आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saudi Arabia King Abdullah Died, Prince Salman Is Successor

सौदी अरेबिया किंग अब्दुल्ला यांचे निधन, प्रिंस सलमान नवीन किंग घोषित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरेबियाचे किंग अब्दुल्ला बिन अब्दुल अजिज अल सौद यांचे निधन झाल्याचे सौदी शासकीय वाहिनीने सांगितले आहे. ते 90 वर्षांचे होते. अमेरिकेच्या अल-कायदा विरोधी युद्धात सक्रिय सहभाग घेणाऱ्या अब्दुल्ला यांनी सौदी अरेबियात मुस्लिम सत्ता असतानाही सुधारक आणि समकालिन धोरणे राबविली. महिला सबलिकरणात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अदा केली आहे.
शुक्रवारी पहाटे 1 वाजता किंग अब्दुल्ला यांचा मृत्यू झाल्याचे शासकीय वाहिनीने सांगितले. त्यांचे सावत्र बंधू प्रिंस सलमान यांच्या नावाची नवीन सुलतान म्हणून घोषणा करण्यात आली आहे. सलमान हे 79 वर्षांचे आहेत. सलमान यांच्या नावाची अब्दुल्ला यांचे उत्तराधिकारी म्हणून आधीच घोषणा करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून अब्दुल्ला आजारी असल्याने सलमान यांनी त्यांच्या काही जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्या होत्या.
2005 मध्ये अब्दुल्ला यांची किंग म्हणून घोषणा करण्यात आली होती. कित्येक वर्षांपासून राजघराण्याकडून राबविली जाणारी धोरणे त्यांनी बदलली. मिडल इस्टला आर्थिकदृष्या समृद्ध करण्यासाठी राष्ट्राची संपत्ती वापरली. शिया मुस्लिमांची सत्ता असलेल्या इराणला त्यांचा कडवा विरोध होता. मिडल इस्टमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनांनाही त्यांचा विरोध होता.
सावत्र बंधू फाहद यांनी सिंहासन सोडल्यावर 1982 मध्ये अब्दुल्ला यांची क्राऊन प्रिंस म्हणून निवड करण्यात आली होती. 1995 मध्ये फाहद आजारी पडल्यानंतर अब्दुल्ला यांच्याकडे राज्याची खऱ्या अर्थाने जबाबदारी आली होती. अब्दुल्ला अमेरिकेचे विश्वासू मानले जायचे. 1990 मध्ये इराकने कुवैतवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेने आपल्या फौजा सौदी अरेबियाच्या मदतीसाठी धाडल्या होत्या. तेव्हापासून अमेरिकी फौजा कुवैतमध्ये होत्या. अखेर 2003 मध्ये या फौजा अब्दुल्ला यांच्या विनंतीनंतर परतल्या.
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यात अमेरिकी अपयशी ठरत असल्याने अब्दुल्ला निराश होते. 1967 मध्ये बळकाविलेल्या जागेवरुन माघार घेतली तर इस्रायलवर हल्ला न करण्याची हमी अरब लीगकडून दिली जाईल, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव अब्दुल्ला यांनी पुढे ठेवला होता.
अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर किंग अब्दुल्ला यांनी लगेच अल-कायदा विरोधी लढ्याला आपला पाठिंबा दिला होता. अमेरिकेवर हल्ला करणाऱ्या 19 दहशतवाद्यांपैकी तब्बल 15 दहशतवादी सौदी अरेबियाचे होते.
पुढील स्लाईडवर बघा, सलमान बिन अब्दुल अजिज अल सौद यांचे छायाचित्र... आणि जगातील प्रमुख राष्ट्रप्रमुखांसोबत अब्दुल्ला...