आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीत दोन महिन्यांत 10 जणांना मृत्युदंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियाध - हत्येच्या प्रकरणात या वर्षी सौदी अरेबियात आतापर्यंत दहा जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. रविवारी दहाव्या दोषी व्यक्तीचा शिरच्छेद करण्यात आला.

मक्का शहरात रविवारी या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. 2013 मध्ये सौदीत 78 जणांना देहदंड ठोठावण्यात आला होता. 2010 मध्ये सौदीत 27 जणांना ही शिक्षा देण्यात आली होती. 2011 मध्ये ही शिक्षा झालेल्या दोषींची संख्या 82 एवढी होती. त्यात 28 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. 2012 मध्ये शिक्षेचे प्रमाण 79 होते. त्या वर्षीदेखील मृत्युदंड झालेल्यांमध्ये 27 परदेशी नागरिकांचा समावेश होता. अत्याचार, हत्या, अपहरण, खंडणी, दरोडा, अमली पदार्थाची तस्करी या गुन्ह्यांमध्ये येथे अत्यंत कठोर शिक्षा दिली जाते. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने सौदीच्या या कृतीचा निषेध केला आहे.