आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saudi Women Renew Push For The Right To Drive Saudi Arab Shocking Laws

सौदी महिलांना कार चालविण्यावर बंदी: शरिया कायद्यानुसार मानले जाते गैरइस्लामिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- सौदी अरबमध्ये महिलांवर शरिया कायद्यानुसार कार चालविण्यास बंदी आहे. परंतु या कायद्यामुळे मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे म्हणत एक संघटना रस्त्यावर उतरली आहे. सौदी महिलाना कार चालविण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी 'एमनेस्टी इंटरनॅशनल' या संघटने गेल्या सहा महिन्यांपासून एक कॅम्पेन सुरु आहे. विशेष म्हणजे रियादमध्ये शनिवारी (29 मार्च) अमे‍रिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा दौर्‍यावर येत आहे. त्यांचे लक्ष वेधण्यासाठी या संघटना अनोखे आंदोलन करणार आहे.

दरम्यान, सौदी अरबमध्ये शरिया कायद्यानुसार महिलांना कार चालवणे गैरइस्लामिक मानले जाते. या कायद्याविरोधात एमनेस्टी इंटरनॅशनल रस्त्यावर उतरली आहे. सौदी सरकारचा जगावेगळा कायदा रद्द करण्‍याच्या मागणीने जोर धरला आहे. या कॅम्पेनच्या माध्यमातून महिलांना कार चालविण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. याशिवाय संपूर्ण देशात लोकशाहीत सगळ्यात मोठी सुधारणा होणार आहे.

महिलांनवर कार चालविण्यास बंदी असलेला सौदी अरब हा जगात एकमेव देश आहे: या कायद्याच्या विरोधात अमेरिकन कॉंग्रेसच्या 70 सदस्यांनी बराक ओबामांना पत्र लिहिले आहे. सौदी अरबमध्ये मानवाधिकाराचे उल्लघंन होत असल्याचे त्यात म्हटले आहे.

एमनेस्टी इंटरनॅशनलचे ओबामांकडे मागणी...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सौदी अरबच्या दौर्‍यावर येत आहेत. बराक ओबामा दौर्‍यादरम्यान सीक्रेट सर्व्हिसच्या महिला सदस्यांचा कार चालक म्‍हणून बोलवावे, अशी मागणी एमनेस्टी इंटरनॅशनलने ओबामांकडे केली आहे. ओबामांनी असे केल्यानंतर सौदी अरबमधील महिलांमध्ये जनजागृती होईल.

दरम्यान, 26 ऑक्टोबर 2013 पासून या संघटनेचे कॅम्पेन सुरु आहे. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त सौदी महिलांनी कार चालवून शरिया कायद्याकडे पाठ केली आहे.
पुढील स्लाइड्‍सवर जाणून घ्या सौदी अरबमधील जगावेगळ्या कायद्याविषयी.