आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Child Uncontrol Builet Fired In America, 1 Died

अमेरिकेत शाळकरी मुलाचा बेछूट गोळीबार; 1 ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - न्यू टाऊनमधील रक्तपाताच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झालेही नाही तोच पुन्हा गोळीबार झाल्याचे शनिवारी उघड झाले. विद्यार्थ्याने वर्गात बेछूट गोळीबार केला. त्यात दोन विद्यार्थी जखमी झाले. घटनेत गोळीबार करणारा विद्यार्थी ठार झाला.
न्यू टाऊनच्या कोलोराडो येथील अरापाहो हायस्कूलध्ये शुक्रवारी हा हल्ला झाला. गेल्या वर्षी ऑरोरा सिनेमागृहाच्या परिसरात गोळीबार झाला होता. त्या ठिकाणापासून हायस्कूल काही अंतरावरच आहे. घटनेत जखमी झालेल्या मुलीची (15) स्थिती गंभीर असल्याचे अरापाहो कौंटीचे शेरीफ ग्रासन रॉबिन्सन यांनी सांगितले. कार्ल पिअर्सन (18) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता हा रक्तपात घडून आला. हल्लेखोर विद्यार्थी कारने शाळेत नेहमीप्रमाणेच दाखल झाला. परंतु त्याने शाळेत प्रवेश करताच विशिष्ट शिक्षक कोठे आहेत, अशी विचारणा करून त्यांचा शोध घेण्यासाठी धावाधाव केली. त्याच्या हातातील बंदूक पाहून विद्यार्थी हादरले. अखेर शेकडो विद्यार्थ्यांनी संरक्षणासाठी स्वत:ला शाळेच्या वर्गखोल्यात कोंडून घेतले. बाहेर गोळीबार सुरू होता. पाच मिनिटांच्या या थरारक घटनेत दोन विद्यार्थी जखमी झाले. त्यानंतर काही वेळातच हल्लेखोर आपल्याच गोळ्यांनी गंभीर अवस्थेत आढळून आला. नंतर त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
सुडातून कृत्य : विद्यार्थी शाळेत बंदूक घेऊन घुसल्यानंतर त्याची नजर कोणाच्या तरी शोधात होती. त्यावरून प्राथमिक माहितीनुसार तरी हे कृत्य सुडातून करण्यात आले असावे, असे पोलिसांना वाटते.
आम्ही कोंडून घेतले होते
मी आणि माझे 25 वर्गमित्र एकाच वर्गखोलीत दार बंद करून जीव मुठीत धरून बसलो होतो. बाहेर नेमके काय चालले आहे याचा अंदाजदेखील आम्हाला बांधता येत नव्हता. काही मुले मात्र भेदरली होती. ती ढसाढसा रडू लागली. आम्ही खोलीतील दिवा बंद करून दाराला कुलूपबंद केले होते.
-एक विद्यार्थी
शूटआऊटचा सिलसिला
अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या घटना थांबायचे नाव घेताना दिसत नाहीत. न्यू टाऊनमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेला शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्याअगोदरच शुक्रवारी ही घटना घडल्याने सरकार पुन्हा हादरले. गेल्या वर्षी कनेक्टिकटमधील गोळीबारात 26 जण ठार झाले होते. मृतांमध्ये 20 लहान मुलांचाही समावेश होता.