आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School To Test DNA Of Male Pupils And Teachers News In Divya Marathi

बलात्कार्‍याचा शोध; 500 जणांची डीएनए

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - फ्रान्समध्ये बलात्कारातील आरोपीची ओळख पटवण्यासाठी 500 जणांची डीएनए चाचणी होणार आहे. शाळेतच एका मुलीवर सप्टेंबरमध्ये अतिप्रसंग झाला होता. त्या वेळी शाळेत वीज नव्हती. घटना घडली तेथे काळोख होता. त्यामुळे विद्यार्थिनी आरोपीला ओळखू शकली नाही. तिच्या कपड्यांवर आरोपीचे डीएनए सॅम्पल आढळून आले होते.

आता शाळेतील पुरुष सदस्यांचे डीएनए सॅम्पल घेण्यात येणार आहेत. त्यात 475 विद्यार्थी, 31 शिक्षक व 21 इतर कर्मचारी आहेत. फ्रान्समध्ये आरोपीची ओळख पटविण्यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारे चाचणी घेण्यात येत आहे. डीएनए टेस्ट मंगळवार, बुधवार चालेल. या प्रक्रियेसाठी 4 लाखांवर खर्च येईल. महिनाभरानंतर आरोपीची ओळख पटेल.