आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Science News In Marathi, Computer, Pain, Toranto University, Divya Marathi

वेदना खरी आहे की खोटी, हे माणसापेक्षाही संगणक अधिक अचूकपणे हेरू शकते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - वेदना होत असल्याची बतावणी खरी आहे की खोटी, हे माणसापेक्षाही संगणक अधिक अचूकपणे हेरू शकते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. यादृच्छिक संधी जेवढ्या चातुर्याने वेदनेचा बनाव आणि ख-या वेदना यातील फरक करू शकते, तेवढा अचूकपणे माणसाला फरकच करता येत नाही. त्यांना प्रशिक्षण दिले तरीही अचूकतेचे प्रमाण केवळ 55 टक्क्यांवर येऊन पोहोचते. या उलट खरे आणि खोट्यातील फरक हेरण्याचे संगणक प्रणालीचे प्रमाण 85 टक्के अचूक असल्याचे सॅन दिएगोतील कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि टोरंटो विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे.

संगणक प्रणाली मानवी चेह-यावरील हावभावातील गतिमान हालचाली चपखलपणे हेरते, तेच माणसाला जमत नाही. त्यामुळे दुखत असल्याचा बनाव करणा-या व्यक्ती माणसाला चकवा देण्यात यशस्वी ठरू शकतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे.