आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पहिला आरोग्यदायी पिझ्झा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ‘जंक फूड’ म्हणून पिझ्झाकडे नाक मुरडणा-यांसाठी ही बातमी आहे. पोषणमूल्ये असलेला पिझ्झा तयार करण्यात ब्रिटिश संशोधकांना यश आले आहे. त्यामुळे चटपटीतपणा सोबत आरोग्यही मिळणार आहे.

जंक फूड गँगमधील पिझ्झा आता खवय्यांच्या आरोग्याचीही काळजी घेईल. इट बॅलन्स्ड डॉट कॉमवर त्याची माहिती मिळते. तीन प्रकारच्या चवीमध्ये हा पिझ्झा उपलब्ध करून देण्यात आला आहे. केवळ पिझ्झाच नव्हे तर जंक फूड म्हटल्या जाणा-या इतर पदार्थांमधील पोषण मूल्ये वाढवता येऊ शकतात. पारंपरिक पिझ्झामध्ये पोषणमूल्ये तुलनेने खूप कमी असतात. त्यामुळे पिझ्झामधील पदार्थ हृदयाचे आरोग्य राखणारे असावेत, असे प्रोफेसर माइक लिन यांनी सांगितले. लिन ग्लासगो विद्यापीठात फिजिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट आहेत. धंदेवाईक पद्धतीने पिझ्झा तयार करणारे लोक त्यात मिठाचे प्रमाण वाढवतात. अनेकदा त्यात खनिजाचे अस्तित्वदेखील सापडत नाही. त्यामुळे ते आरोग्यासाठी धोकादायक ठरते. डॉ. एमिली कॉमबेट, अमांडीन जारलॉट, कोफी एअडू यांच्या संशोधक चमूने हा अभ्यास केला.

धक्कादायक वास्तव
पिझ्झामधील कॅलरीची पातळी तपासण्यात आली. 200 ते 562 पर्यंतची उष्मांकाची नोंद करण्यात आली. वास्तविक जेवणानंतर 600 उष्मांक ऊर्जा मिळू शकते. त्यासाठी संशोधकांनी 25 पिझ्झांची तपासणी केली. यातील आठ पिझ्झा तेलयुक्त असतात. सहा पिझ्झांमध्ये मोठ्या प्रमाणात फॅट दिसून आले.

कसा तयार झाला नवा पिझ्झा ?
पिझ्झासाठी संपूर्ण गव्हाचे पीठ वापरावे. व्हिटॅमिन बी-12, फायबर, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12, आयोडिन, व्हिटॅमिन सी चा वापर झाल्यास पिझ्झाचे पोषणमूल्य वाढेल, असा दावा संशोधकांनी केला आहे. पिझ्झामधील मिठाचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला संशोधकांनी खाद्य कंपन्यांना दिला आहे. त्यानुसार प्रयोगशाळेत त्याचे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.