आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scientist Engages In To Redefine One Kilogram Wight

एक किलोग्रॅम वजनाची नव्याने व्याख्‍या करण्‍याचे शास्‍त्रज्ञांचे प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्लॅटिनम आणि इरिडियम धातूपासून बनलेले एक सिलिंडर पॅरिसमध्ये ठेवलेले असून ते एक किलोग्राम वजनाचे मानक समजले जाते. ‘ली ग्रँड के’ नावाच्या या सिलिंडरला तीन हवाबंद बाटल्यांमध्ये ठेवले आहे. हवेतील आद्र्रता तसेच हातांच्या स्पर्शाने ते अशुद्ध होऊ नये म्हणून ते 40 वर्षांतून एकदा बाहेर काढले जाते. तीन कुलुपांत बंद असलेल्या या सिलिंडरची किल्ली वजने आणि मापांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडे असते. ली ग्रँड के बाटलीतून बाहेर काढले जाते, तेव्हा ते अल्कोहोलने धुतले जाते आणि जगभरातील प्रयोगशाळांतून पाठवलेल्या 80 अधिकृत वजनांच्या प्रतिकृतींची पडताळणी केली जाते. 1791 मध्ये भौतिक मूळ नमुन्याच्या आधारे फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सने मोजण्याचे सात मानकं ठरवून दिले होते. हे मानकं जगाने तत्काळ मान्य केले, कारण जगात कुठेही मोजण्यासाठी ठोस एकक नव्हते. त्यावेळी फक्त फ्रान्समध्येच मोजण्यासाठी वेगवेगळे अडीच लाख एकके वापरात होती. 1988 मध्ये ली ग्रांड के बाहेर काढण्यात आले होते, तेव्हा इतर वजनांच्या प्रतींच्या तुलनेत 0.05 मिलीग्राम कमी भरले. हे वजन का कमी भरले, याचे उत्तर तज्ज्ञांकडे नाही. या प्रती वारंवार बाहेर काढल्या जातात त्यामुळे हवा आणि अनेकदा स्पर्श केल्यामुळे त्या प्रतिकृतींमधील भार काही प्रमाणात वाढला असेल. त्यामुळे आता वजन मोजण्यासाठी अधिक विश्वसनीय पद्धत तयार करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ सध्या एक किलोग्रॅम सिलिकॉन गोळ्यातील अणूंची संख्या मोजण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजीमधील भौतिकशास्त्रज्ञ एक किलोग्रॅम वजन उचलण्यासाठी किती व्होल्टेज लागते, यावरून त्या वजनाची व्याख्या करत आहेत. मात्र, या प्रयत्नांपैकी कोणतीही पद्धत ‘ली ग्रँड के’ची बरोबरी करू शकली नाही. B mentalfloss.com