Home | International | Other Country | scientist from indian origin honoured with knighthood

भारतीय वंशाच्‍या शास्‍त्रज्ञाचा इंग्‍लंडमध्‍ये 'नाईटहूड'ने गौरव

वृत्तसंस्‍था | Update - Dec 31, 2011, 10:38 AM IST

हा सन्‍मान मिळविणा-या मोजक्‍याच नामवंत व्‍यक्तींच्‍या यादीत रामकृष्‍णन यांचा समावेश झाला आहे.

  • scientist from indian origin honoured with knighthood

    लंडनः भारतीय वंशाचे शास्‍त्रज्ञ वेंकटरामन रामकृष्‍णन यांना इंग्लंडमधील प्रतिष्‍ठेच्‍या 'नाईटहुड' सन्‍मानाने गौरविण्‍यात आले आहे. हा सन्‍मान मिळविणा-या मोजक्‍याच नामवंत व्‍यक्तींच्‍या यादीत रामकृष्‍णन यांचा समावेश झाला आहे. इंग्‍लंडमध्‍ये राहणा-या परदेशी नागरिकांना क्‍वचितच या सन्‍मानाने गौरविण्‍यात येते. रामकृष्‍णन यांना 2009 मध्‍ये र‍सायनशास्‍त्रातील नोबल पुरस्‍कार देण्‍यात आला होता.
    स्‍थलांतरीत नागरिकांचे ब्रिटीश समाजामध्‍ये फार मोठे योगदान आहे. हा सन्‍मान त्‍याचेच एक प्रतिक असून या योगदानाची दखल घेण्‍यात आल्‍याचे रामकृष्‍णन यांनी सांगितले. रामकृष्‍णन यांना 'मॉलिक्‍यूलर बायोलॉजी' या क्षेत्रातील योगदानाबद्दल नोबेल पुरस्‍कार देण्‍यात आला होता. ' लेबॉरेटरी ऑफ मालिक्‍यूलर बायोलॉजी'च्‍या संस्‍थापक सदस्‍यांमध्‍ये बहुतांश जण परदेशातील स्‍थलांतरीतच होते. त्‍यांनी आधुनिक जीवशास्‍त्रामध्‍ये मोठे योगदान दिले. या सन्‍मानाचा केवळ मी एकटा नव्‍हे तर माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थ्‍यांना जाते, असे रामकृष्‍णन यांनी सांगितले.
    'नाईटहूड'ने सन्‍मानित करण्‍यात आलेल्‍यांच्‍या नावापुढे 'सर' उपाधी लावण्‍यात येते.
    रामकृष्‍ण यांच्‍याशिवाय आणखी दोन परदेशी नागरिकांना 'नाईटहूड'ने सन्‍मानित करण्‍यात आले आहे. रशियाचे आंद्रे गिम आणि कोन्‍स्‍टान्‍टीन नोव्‍होसिलोय अशी या प्राध्‍यापकांची नावे आहेत. त्‍यांना 2010 मध्‍ये भौतिकशास्‍त्राचे नोबेल मिळाले होते.

Trending