आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scientist Stephanie Kwolek News In Diyva Marathi

स्टीफेनी कोलेकचा महत्त्वपूर्ण शोध; हजारो लोकांचा वाचवला जीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विज्ञान जगतात सुखद दुर्घटनांची यादी मोठी आहे. मात्र, त्यातील काही शोध अपूर्व आहेत. 1960च्या दशकात स्टीफेनी कोलेकने असाच शोध लावला होता. 18 जूनला 90 वर्षीय स्टीफेनी कोलेक यांचे निधन झाले. कोलेक ड्यूपाँ कंपनीत टायरमध्ये वापरल्या जाणार्‍या नव्या सिंथेटिक फायबरवर संशोधन करीत होत्या. पालिमर व सॉल्वेंटचे एक मिश्रण इतरांपेक्षा वेगळे दिसत असल्याचे त्यांना त्या वेळी आढळले. आपल्याकडून काही चुकतेय असा असा विचार मात्र त्यांनी केला नाही. त्यावरील काम त्यांनी सुरूच ठेवले. जेव्हा त्यांचा फॉर्म्युला फायबरच्या रूपात बदलला, तेव्हा स्टीलपेक्षा तो पाचपट अधिक मजबूत असल्याचे सिद्ध झाले. ड्यूपाँने फायबरला केवलर असे नाव दिले.

केवलर त्याच्या सुरक्षात्मक शक्तीसाठी ओळखले जाते. बुलेटप्रूफ जॅकेट, बॉडी आर्मर बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. त्यामुळे अनेकांचा जीव वाचला आहे. केवरचे हातमोजे कामगारांच्या हातांचे संरक्षण करतात. केवलरचा उपयोग जहाज, बेसबॉल बॅट, टेनिस रॅकेट, बुटांच्या लेस, सेल फोन व टायरसारख्या वस्तूंना मजबुती प्रदान करतात.

(फोटो - स्टीफेनी कोलेक)