आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Scientists Are Making An Organic, Water based Battery For The Power Grid

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जास्त काळ चालणारी स्वस्त कार्बनिक बॅटरी;भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांचा शोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - शास्त्रज्ञांनी पाण्यावर आधारित आणि प्रदीर्घ काळ चालणारी एक कार्बनिक बॅटरी तयार केली आहे. ही बॅटरी स्वस्त, पर्यावरणाला अनुकूल साहित्याचा वापर करून तयार करण्यात आली आहे. मूळ भारतीय वंश असलेल्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील पथकाने ती तयार केली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅलिफोर्निया डोर्नसाइफ कॉलेज ऑफ लेटर्स, आर्ट अँड सायन्सचे प्राध्यापक श्रीनारायण यांनी सांगितले की, ही बॅटरी जवळपास पाच हजार वेळा रिचार्ज केली जाऊ शकते. ती 15 वर्षांपर्यंत चालेल, असा अनुमान आहे. हे संशोधन इलेक्ट्रोकेमिकल सोसायटी जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.