आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्‍ट्रेलियातील शास्‍त्रज्ञांनी शोधला एड्सवर प्रभावी उपचार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबोर्न- ऑस्‍ट्रेलियाच्‍या शास्‍त्रज्ञांनी जीवघेण्‍या 'एड्स' आजारावर उपचार शोधून काढल्‍याचा दावा केला आहे. हा दावा खरा निघाल्‍यास औषधीशास्‍त्र क्षेत्रातील एक मोठे संशोधन ठरणार आहे. तर एड्सच्‍या रुग्‍णांना जीवनदान मिळणार आहे.

एड्सच्‍या विषाणूमधील एक विशिष्‍ट प्रथिन बदलण्‍यात यश आल्‍याचे सांगून हा बदल झाल्‍यानंतर एड्सचा प्रतिकार करणे शक्‍य होते, असे शास्‍त्रज्ञांनी सांगितले. हे संशोधन करणा-या गटातील शास्‍त्रज्ञ डेव्हीड हॅरीच यांनी यासंदर्भात सविस्‍तर माहिती देताना सांगितले की, एड्सच्‍या विषाणूमधील प्रथिन बदलून त्‍याच्‍याजागेवर दुसरे प्रथिन टाकण्‍यात आम्‍हाला यश आले. यामुळे एड्सच्‍या विषाणूचा प्रसार थांबतो. यामुळे एड्स बरा होत नाही. परंतु, एड्सची वाढ थांबून प्रतिकारशक्ती वाढते, असे हॅरीच यांनी सांगितले. या बदललेल्‍या प्रथिनामुळे मानवी पेशींचे रक्षण झाल्‍याचे निरिक्षण प्रयोगशाळेतील चाचण्‍यांमध्‍ये नोंदविण्‍यात आले. या उपचारपद्धतीच्‍या क्लिनिकल ट्रायल्‍स यशस्‍वी झाल्‍यास एड्सवरील उपचारांची दिशाच बदलेल, असे हॅरीच म्‍हणाले.