आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कॉटलंड तुटण्याच्या हालचालींनी खळबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रेट ब्रिटनपासून वेगळे होण्याविषयी १८ सप्टेंबरला प्रस्तावित जनमत संग्रहापूर्वी स्कॉटलंडमध्ये राष्ट्रवादी भावना तीव्र होऊ लागल्या आहेत. पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ जास्त मते मिळाली आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये खळबळ माजली आहे. शेअर मार्केट डगमगले आहेत.

हळुवार सुरुवात – या महिन्याच्या प्रारंभापर्यंत ब्रिटनमध्ये बहुतांश पर्यवेक्षक विभाजनाची शक्यता फेटाळून लावत होते. माजी अर्थमंत्री अलिस्टेअर डार्लिंग स्वातंत्र्याच्या मागणीविरोधात अभियान चालवत आहेत. ते म्हणतात, ब्रिटनपासून विभक्त झाल्यास स्कॉटलंडचे नुकसान होईल. डाव उलटला – स्वातंत्र्य समर्थक चळवळीचे नेते आणि स्कॉटलंडचे फर्स्ट मिनिस्टर अॅलेक्स सॅमंड यांनी ऑगस्टला टीव्ही चर्चेत डार्लिंगना मागे टाकले. ६ सप्टेंबरला झालेल्या मतदानात स्वातंत्र्याच्या बाजूने ५१ व विरोधात ४९ टक्के मते पडली.

प्रतिक्रिया – ग्रेट ब्रिटनचे नेते ३०७ वर्षे जुना संघ वाचवण्याचा जीव तोडून प्रयत्न करत आहेत. ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड केमरून बाजू मांडण्यासाठी १० सप्टेंबरला स्कॉटलंडला धावत गेले. स्वातंत्र्याविरुद्ध मत देण्याच्या स्थितीत स्कॉटलंडला अधिक स्वायत्तता देण्याचे वचन देण्यात आले आहे.