आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Scotland News In Marathi, Britain, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्कॉटलंडचे आज भवितव्य ठरणार, ब्रिटनमध्ये राहायचे की स्वतंत्र व्हावयाचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एडिंगबर्ग - ब्रिटनमध्ये राहायचे की ३०७ वर्षांचे संबंध संपुष्टात आणत स्वतंत्र व्हावयाचे यासाठी गुरुवारी स्कॉटलंडमध्ये सार्वमत घेण्यात आले. साधारण ४० लाख लोकसंख्येपैकी ९७ टक्के नागरिकांनी मतदानासाठी नोंदणी केली होती. शुक्रवारी सकाळी सार्वमताचा निकाल हाती येणे अपेक्षित आहे.

मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. आपापल्या पर्यायाबाबत लोक भावूक होऊन मत व्यक्त करत होते. या निर्णयाचा दूरगामी परिणाम माझ्या मुलांच्या भवितव्यावर होणार असल्याचे ३४ वर्षीय चार्लोट फािरश या महिलेने सांिगतले. मुलांना शाळेत सोडण्यापूर्वी व कार्यालयात जाण्याआधी तिने मतदानाचा हक्क बजावला. मागील काही जनमत सर्वेक्षणांत लोकांनी स्वतंत्र होण्यात उत्सुकता दाखवली आहे.

अँडी मरेचा पाठिंबा : स्कॉटलंडचा प्रसिद्ध खेळाडू, टेनिस स्टार अँडी मरेने शेवटच्या क्षणी स्वातंत्र्याच्या चळवळीस पाठिंबा दिला. त्याने नो कॅम्पेन ऑफ निगेटिव्हिटी या आशयाचे टि्वट केले. स्वतंत्र स्कॉटलंडची हाक देणारे पहिले मंत्री अलेक्स सालमंड यांच्या घोषणेत मरेने सुरात सूर मिसळला. िब्रटिश वृत्तपत्रांनी मरेच्या भूमिकेला ठळक प्रसिद्धी दिली.

यानंतर १२ हजार लोकांनी रिटि्वट केले. आमचे भवितव्य आमच्या हातात घेऊ. भरभराटीची अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्यासोबत नि:पक्ष समाजनिर्मिती करण्याची आपणास संधी प्राप्त झाली आहे, असे सालमंड यांनी मतदानानंतर सांगितले.

...तर कॅमेरॉन यांच्यावर दबाव
पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी घरात राहण्याचे भावनिक आवाहन स्कॉटिश जनतेला केले. विभाजन वेदनादायी तसेच आर्थिक जोखीम वाढवणारे ठरेल. लोकांनी स्वातंत्र्यास होकार दिल्यास स्कॉटलंडचे ब्रिटनसोबत १७०७ पासूनचे संबंध संपुष्टात येतील. परिणामी कॅमेरॉन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढेल.