आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scotland News In Marathi, Referendum, Britain, DIvya Marathi

स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी सार्वमत; काळजीपूर्वक मतदान करण्‍याचे राणीचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्र: स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याला विरोध करणारी एक महिला.)
लंडन - ब्रिटनमध्ये गुरुवारी स्कॉटलंड स्वतंत्र हवे की नाही, यासाठी सार्वमत घेतले जाणार आहे. राणी एलिझाबेथ-२ ने स्कॉटिश जनतेला काळजीपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले आहे. स्कॉटिश जनतेच्या भविष्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे त्या म्हणाल्या. अ‍ॅबर्डीनशायर येथील चर्चच्या बाहेर एलिझाबेथ यांनी प्रथमच जनतेला थेट आवाहन केले. गेल्या आठवड्यात बकिंगहॅम पॅलेसद्वारे राजकीय नेत्यांना राणी एलिझाबेथ यांना या प्रक्रियेत न ओढण्याचे निर्देश देण्यात आले होते.

१८ महिन्यांची प्रक्रिया
ब्रिटनमध्ये गुरुवारी ऐतिहासिक मतदान होणार असून जनतेने होकारार्थी कौल दिल्यास स्कॉटलंड ब्रिटनपासून विभक्त होईल. ही प्रक्रिया १८ महिन्यांत पूर्ण होऊ शकते. दरम्यान, स्कॉटलंडचे पहिले मंत्री अ‍ॅलेक्स सॅमंड आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हडि कॅमरून हे दोघेही मतदानाच्या प्रचारमोहिमेत उतरले आहेत. सॅमंड हे उद्योग जगताला सोबत घेऊन जनतेला होकारार्थी कौल देण्याचे आवाहन करत आहेत. त्याद्वारे स्कॉटलंडची आर्थिक घडी बसवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत, तर दुसरीकडे कॅमरून भावनिक पातळीवर नागरिकांना नकारार्थी कौल देण्यास सांगत आहेत.

डेव्हडि बेकहॅमही मोहिमेत
लोकप्रिय ब्रिटिश फुटबॉलपटू डेव्हडि बेकहॅमदेखील या मतदानाच्या प्रचार मोहिमेत उतरला असून स्वतंत्र स्कॉटलंडविरोधात मतदान करण्याच्या बाजूने आहे. नकारार्थी मतदान करून तो ब्रिटन-स्कॉटलंडमधील नात्याला पुनरुज्जीवन देण्याचे आवाहन करत आहे.