आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Second Day Syria's Problem Not Solve In The Peace Talks

शांतता चर्चेच्या दुस-या दिवशीही सिर‍ियातील पेच सोडण्‍यास अपयश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माँट्रेक्स - तीन वर्षांपासून न सुटलेला सिरियातील पेच सोडवण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये शांतता चर्चेच्या दुस-या दिवशी कसलाही तोडगा निघू शकला नाही. रक्तपात थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राची धडपड सुरू असून तोडगा निघत नसल्याने घालमेल सुरू झाली आहे. संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधी लखदर ब्राहिमी यांनी असाद सरकारचे प्रतिनिधी व बंडखोरांची स्वतंत्र बैठक घेतली. उभयपक्ष उद्या शुक्रवारपासून सुरू होणा-या थेट बोलणीत सहभागी होणार आहेत अथवा नाही हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. शुक्रवारपासून जीनिव्हा येथे संयुक्त राष्ट्राचे दूत ब्राहिमी यांच्या अध्यक्षतेखाली असाद सरकार, बंडखोर व अमेरिकेसह पाश्चात्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींमध्ये थेट वाटाघाटी होणार आहेत.
स्वित्झर्लंडमधील माँट्रेक्स येथील प्राथमिक बैठकीत दोन्ही पक्ष चर्चेसाठी एकत्र आले. गेल्या अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. आता दोन्ही बाजूने चर्चेची तयारी दर्शवण्यात आली आहे, हे महत्त्वाचे आहे. चर्चेतून फार काही फलित झाले नाही, परंतु दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे यश चर्चेतून मिळाले आहे. चर्चेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले पाहिजे, असे मत मुत्सद्यांनी व्यक्त केले आहे. बुधवारपासून चर्चेला सुरुवात झाली. त्यात लष्करी राजवट आणि बंडखोरांकडून सहमती दर्शवण्यात यावी. आता खूप झाले. हा हिंसाचार तत्काळ थांबावा अशी जगाची इच्छा आहे. दोन्ही बाजूने सहमतीसाठी एकमत घडून आले पाहिजे, असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे नेते बान की मून यांनी केले होते. दरम्यान, संयुक्त राष्ट्राकडून एखाद्या राजकीय मुद्द्यावर मोठ्या पातळीवर चर्चेचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चर्चेत 40 देशांतील मुत्सद्द्यांचा सहभाग होता.
का फिसकटले ?
बशर अल असाद पदावरून पायउतार होणार नाहीत, असे सरकारच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. असाद यांनी पायउतार व्हावे, त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा, अशी भूमिका सिरियातील बंडखोरांनी घेतली. परंतु असाद जाणार नाहीत, असे सरकारकडून सांगण्यात आले. त्यामुळे चर्चा झाली असली तर त्यात पुढे प्रगती होऊ शकली नाही. बंडखोरांचे प्रमुख अहमद जारबा यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.