दुसर्या महायुद्धात 9 मे 1945 रोजी नाझी र्जमनीने तेव्हाच्या सोव्हिएत युनियन आणि आताच्या रशियन सैन्यासमोर शरणागती पत्करली. नाझींच्या पराभवाचा आणि रशियन सैन्याच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रशियात 9 मे हा विजय दिन साजरा करण्यात येतो. मंगळवारी मॉस्कोमध्ये विजय दिन संचलनाची रंगीत तालीम करण्यात आली. मॉस्कोच्या रेड स्क्वेअरमध्ये शनिवारी हा नेत्रदीपक सोहळा साजरा करण्यात येईल.