आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : प्रथमच पाहायला मिळाले ISIS चे साम्राज्‍य, गोपनीय कॅमे-याने केले चित्रण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : सीरियामधील रक्‍का शहरात हत्यारे घेऊन असलेला आयएसआयएसचा एक सदस्य

दमिश्‍क - इराक आणि सीरियामध्ये हिंसाचार माजवणारी दहशतवादी संघटना ISIS च्या साम्राज्याचे दर्शन घडवणारा एक VIDEO समोर आला आहे. एका महिलेने बुरख्यात कॅमेरा लपवून हा व्हिडिओ शूट केल्याचे वृत्त आहे. सीरियातील शहर आणि इस्‍लामिक स्‍टेटची राजधानी रक्‍का मध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे.
हा व्हिडिओ फ्रान्सच्या फ्रान्स 2 या वाहिनीवर प्रसारीत करण्यात आला आहे. ISIS कडे सदस्यांची काहीही कमतरता नसून प्रत्येकाकडे हत्यारे असल्याचे यात दाखवण्यात आले आहे. महिला बुरख्यात दिसून येत असून त्यांच्याकडेही हत्याचे असल्याचे दिसून येत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये
इस्‍लामिक स्‍टेटमध्ये महिला खांद्यावर बंदुका घेऊन मुलांबरोबर फिरत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते आहे. रेकॉर्डींग करणा-या महिलेला एका ठिकाणी कारमध्ये बसलेले काही दहशतवादी थांबवून तिचा बुरखा ठीक नसल्याचे सांगत असल्याचेही रेकॉर्डींग आहे. तिच्या चेह-याचा काही भाग दिसत असल्याचे त्यांनी या महिलेला सांगितले. त्यावर महिलेने त्यांची माफी मागितली. तेव्हा सार्वजनिक ठिकाणी चांगली वर्तणूक असावी असे तिला त्यांनी सांगितले. तर एक जण म्हणाला, ज्यांचा चेहरा झाकलेला असतो, अल्लाह त्यांच्यावरच प्रेम करतो.

'जिहाद'मध्ये फ्रान्सच्या महिला
त्यानंतर महिला एका सायबर कॅफेकडे गेली. त्याठिकाणी तिला फ्रान्समधून कुटुंब सोडून जिहाद साठी इस्लामिक स्टेटमध्ये आलेल्या महिला आढळल्या. कॅफेमध्ये या महिला फ्रान्समधील त्यांच्या कुटुबीयांशी अस्खलित फ्रेंच भाषेत बोलत होत्या. त्यापैकी एका महिलेची चर्चा तिने ऐकली. ती तिच्या आईशी बोलत होती. 'मी परत येणार नाही. मी परत येण्यासाठी एवढा मोठा धोका पत्करून इथे आले नाही. तुम्ही रडू नका', असे ती म्हणत होती. 150 हून जास्त महिला याठिकाणी जिहादमध्ये सहभागी होण्यासाठी आल्या आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा PHOTO आणि शेवटच्या स्लाइडवर पाहा VIDEO