आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Security Council Membership Decision Will Be Finall This Year

सुरक्षा परिषद सदस्यत्व; निर्णय याच वर्षी हवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्रे - प्रदीर्घ काळापासून बदलाच्या प्रतीक्षेत असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेसाठी हे वर्ष निर्णायक असून यात संयुक्त राष्ट्राने लक्ष घालावे, असे भारताकडून सांगण्यात आले आहे. आंतरसरकार वाटाघाटीच्या (आयजीएन) अकराव्या फेरीतील चर्चा निष्फळ ठरली आणि त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्याचे भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील प्रतिनिधी तसेच राजदूत भगवंत बिष्णोई यांनी सांगितले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील सदस्यत्वाबाबत या आठवड्यात आयोजित बैठकीवेळी बिष्णोई बोलत होते. ते पुढे म्हणाले, २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर हे वर्ष विविध राष्ट्रांच्या वाटाघाटीसाठी निर्णायक ठरू शकते. त्यामुळे वाटाघाटीबद्दलच्या बाबी आणि सदस्यत्वाबाबतचा निर्णय या वर्षात व्हायला हवा.

भारताचे स्थायी सदस्यत्व अमान्य : पाकिस्तान
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सभासदत्व देणे आपल्याला मान्य नसल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे.