अमेरिकेच्या सुरक्षा विषयक / अमेरिकेच्या सुरक्षा विषयक हजारो ई-मेलची हॅकिंग

वृत्तसंस्था

Dec 26,2011 11:34:02 PM IST

ह्यूस्टन - अमेरिकेच्या सुरक्षाविषयक हजारो ई-मेलची हॅकिंग करण्याबरोबरच क्रेडिट कार्डचा तपशीलही पळवण्यात आल्याचा दावा अ‍ॅनॉनिमस नावाच्या हॅकर्स गटाने सोमवारी केला. या सायबर हल्ल्यामुळे आता अमेरिकन प्रशासनाची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे चोरीच्या सर्व क्रेडिट कार्डचे दान केल्याचेही हॅकर्सनी स्पष्ट केले. हॅकर्सनी हल्ला केलेल्या कंपनीचे नाव स्ट्रॅटफॉर असे आहे. या कंपनीच्या ग्राहकांमध्ये अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय, मीडिया समूह व कायदा-व्यवस्था करणा-या यंत्रणांचा समावेश आहे. त्यामुळे इ-मेल हॅक करण्यात आले आहेत. त्याचबरोबर चोरी करण्यात आलेल्या क्रेडिट कार्डचा वापर हा स्वयंसेवी संस्थांना दान म्हणून करण्यात आल्याचा दावाही अ‍ॅनॉनिमसने केला आहे.
सुमारे चार हजार क्रेडिट कार्ड व कंपनीच्या खाजगी ग्राहकांची यादी आपण मिळवली असल्याचा दावा हॅकर्सनी केला आहे. परंतु स्ट्रॅटफॉर कंपनीने अशा प्रकारचा हॅकिंग झाल्याचे स्पष्टपणे मान्य केलेले नाही. काही लोकांची यादी चोरीला गेली आहे. परंतु आम्ही वैयक्तिक डाटा जपून ठेवला आहे. आम्ही यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहोत, असे कंपनीचे सीईओ जॉर्ज फ्रिडमन यांनी म्हटले आहे. गोपनीय अहवालाविषयीच्या ग्राहकांची कंपनीला अधिक चिंता आहे. कारण त्यांनी दिलेली माहिती आमच्या सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

X
COMMENT