बेस्ट एरियल फोटोज 2014 स्पर्धेत सॅटेलाईटच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या फोटोंमधून 21 लक्षवेधक फोटो निवडण्यात आले आहेत. आकाशातून हजारो फुट उंचीवरुन जगातील वेगवेगळ्या भागांचे टिपलेले हे फोटो आहेत. डिजिटल ग्लोबद्वारे हे प्रकाशित करण्यात आले आहेत. नैसर्गिक संकटे, युद्ध आणि लोकसंख्येच्या विस्फोटाचे धरणीवर होणारे परिणाम या फोटोंच्या माध्यमातून
आपण बघू शकतो.
कॅलिर्फोनियाच्या सॅन डियागो जंगलात लागलेल्या आगीपासून क्रोएशियात आलेल्या महापुरापर्यंत तर म्युनिख येथील वर्षीक बिअर फेस्टिव्हलही या फोटोंच्या माध्यमातून आपल्याला बघता येतो. इंडोनेशियातील जिवंत ज्वालामुखीही यात बघता येतात. युक्रेनमधील विरोध प्रदर्शनासह आयएसआयएसच्या भीतीने
इराकमधून स्थलांतरीत होत असलेले नागरिकही यात दिसून येतात.
प्रत्येक वर्षी डिजीटल ग्लोबद्वारे वर्षभरातील उत्कृष्ठ फोटो सादर केले जातात. त्यावर ऑनलाईन युजर्सला मतदान करण्यास सांगितले जाते. त्यानंतर बेस्ट फोटोंची निवड केली जाते.
पुढील स्लाईडवर बघा, बेस्ट एरियल फोटोज स्पर्धेत निवडण्यात आलेले निवडक फोटो...