आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Selfie Queen Mortao Maotor And Kim Kardashian, News In Marathi

थायलंडची मार्ताओ बनली \'सेल्‍फी क्‍वीन\' एका आठवड्यात पोस्‍ट केले 200 फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉंक- संपूर्ण विश्‍वाची 'सेल्‍फी क्‍वीन' म्‍हणून किम कार्दशियनना ओळखल्‍या जाते. पण तिच्‍यापेक्षाही बँकॉंकच्‍या मार्ताओ(नाव बदललेले आहे) ने जास्‍त फोटो सोशल साइट्सवर अपलोड केली आहेत. तिने आठवड्यात किमान 200 सेल्‍फी फोटो क्लिक करुन इंस्‍टाग्रामवर पोस्‍ट केली आहेत. त्‍यामुळे 'सेल्‍फी क्‍वीन' म्‍हणून तिच्‍याकडे पाहिले जात आहे.
कोण आहे मार्ताओ
बँकॉंकची रहिवासी असलेली 40 वर्षीय मार्ताओ एक सामान्‍य महिला आहे. मार्ताओ तिचे खरे नाव नाही. परंतु सर्व सोशल साइट्सवर ती याच नावाने प्रसिध्‍द आहे. तिचा पती आर्ट गॅलरीचा मालक असून तिला इंग्रजीचे ज्ञानसुध्‍दा नाही. ती जास्‍तीत जास्‍त वेळ स्‍वताचे फोटो घेण्‍यात आणि ते सोशल साइट्वर पोस्‍ट करण्‍यात वेळ घालवते.
मार्ताओपुढे सर्वच फेल
सेल्‍फी प्रती प्रेम असण्‍यात मार्ताओएवढे कोणीच नाही. ती कायम सेल्‍फीमध्‍ये रममाण झालेली असते. टेक्‍सासमध्‍ये राहणारा पिम्‍पगुडगेम नावाचा व्‍यक्‍ती स्‍वताला सेल्‍फी किंग मानतो. परंतु त्‍याच्‍या फक्‍त 600 पोस्‍ट आहेत. आपल्‍या सुडोल कायने सर्वांना भुरळ घालणारी अमेरिकन मॉडेल जेन सेल्‍टरचे 40 लाख फॉलोअर्स आहेत. परंतु तिच्‍या फक्‍त 457 सेल्‍फी फोटो आहेत.

पुढील स्‍लाइडवर पाहा, मार्ताओने इंस्‍टाग्रामवर पोस्‍ट केलेली छायाचित्रे..