आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senate Panel Releases Reports On Cia Over Brutality And Deceit In Interrogations

CIA टॉर्चर टेक्निक: संशयीतांना 180 तास ठेवले जागे, पेटीसारख्या बॉक्समध्ये ठेवले बंदिस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉश्गिंटन - अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए त्यांच्या ताब्यातील लोकांना मरण यातना देते. ही माहिती मंगळवारी सीनेटमध्ये सादर करण्यात आलेल्या एका अहवालात देण्यात आली आहे. हा खुलासा झाल्यानंतर अमेरिकन संस्थांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वाढली आहे. त्यानंतर जगभरातील अमेरिकन संस्थांना हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
अमेरिकेला भीती आहे, की हा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर अमेरिकेच्या दुतावासांवर किंवा इतर कार्यालयांवर हल्ला होऊ शकतो. अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे प्रवक्ते जोश अर्नेस्ट यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'मोठी संकटे आणि संकेतांमुळे दुतावास आणि अमेरिकेच्या इतर संस्थानांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.'
अमेरिकन सीनेटमध्ये सादर करण्यात आलेल्या या अहवालात 9/11 नंतर अल कायदा विरोधात केल्यागेलेल्या कारवाईचा उल्लेख आहे. अहवालात सीआयए एजंटनी संदिग्ध प्रवाशांकडून माहिती काढून घेण्यासाठी ज्या वादग्रस्त पद्धतींचा अवलंब केला गेला त्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यात सांगितल्यानुसार, संशयितांना स्ट्रेस पोजिशनमध्ये काहीवेळा 180 तासांपेक्षा जास्तवेळ जागे ठेवण्यात आले होते. अहवालात म्हटले आहे, की सीआयएच्या सीक्रेट तुरुंगात 119 संशयीत आहेत. यातील 26 जणांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात डांबण्यात आले आहे.
9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सीआयएने अल कायदाच्या संशयीतांकडून आरोपींची माहिती काढण्यासाठी त्यांना अतिशय कठीण यातना देण्यात आल्या. या अहवालात त्यातील काही खास गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे.
- संशयीत आरोपींच्या डोक्यावर टॉवेल टाकून पाणी टाकणे, कानशिलात लगावणे, तासन् तास झोप न लागू देणे आणि स्ट्रेस पोजिशनमध्ये ठेवणे.
- सऊदीचा अल कायदा संशयीत अबु जुबायदाह याला पेटीसारख्या आकाराच्या बॉक्समध्ये कित्येक तास बंद ठेवले.
- सशंयितांना शारीरिक आणि मानसिक छळ करण्याची धमकी दिली जात होती.
...तरीही माहिती नाही
अहवालात म्हटले आहे, की सशंयितांना मरणाहूनही अधिक यातना देऊनही सीआयएला कोणतीही माहिती मिळाली नाही. हा अहवाल सार्वजनिक केला जावा की नाही, किंवा यातील कोणता भाग सार्वजनिक करावा यावर अमेरिकेत एकमत होत नव्हते, त्यामुळे अहवाल येण्यास उशिर झाला.
अहवालातून काय कळाले
सीआयएच्या माहिती काढण्याच्या पद्धती किती क्रूर असतात याचा जो समज होता, त्या पेक्षाही या पद्धती अधिक भयावह असल्याचा खुलासा झाला. अशा पद्धतीने चौकशी केल्यानंतर त्यात एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो याची देखील त्यांना चिंता नसते. सीआयएचे अधिकारी व्हाइट हाउसला देखील चौकशीसंबंधीची योग्य माहिती देत नव्हते.

फोटो - 9/11 चा मास्टरमाइंड खालिद शेख मोहम्मद याच्यावर सीआयएने वाटरबोर्डींगचा वापर केला. त्यांच्या चेहर्‍यावर वारंवार पाणी टाकले जात होते