आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लंबी जुदाई’चा जादुई आवाज हरपला; पाकिस्तानी गायिका रेशमा यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- आपल्या वेगळ्या ढंगाच्या आवाजाने कित्येक पिढय़ांच्या मनात घर करून राहिलेल्या ज्येष्ठ पाकिस्तानी गायिका रेशमा (66) यांचे रविवारी लाहोर येथे निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून त्या गळ्याच्या कॅन्सरने ग्रस्त होत्या. एक महिन्यापासून त्यांची शुद्धही हरपलेली होती. त्यांच्या पश्चात मुलगा उमेर आणि मुलगी खतिजा असा परिवार आहे.

भारतातील राजस्थानातील बिकानेर येथे 1947 मध्ये एका बंजारा कुटुंबात जन्मलेल्या रेशमा यांचे कुटुंबीय फाळणीनंतर काही काळातच कराची येथे वास्तव्यास गेले होते. त्यांचे भारताशी असलेले नाते मात्र तुटले नाही. त्यांच्या आवाजाने हे नाते अधिकच दृढ केले.

रेशमा यांनी गायनाचे औपचारिक शिक्षण कुठेही घेतले नव्हते. आवड म्हणून त्या दग्र्यामध्ये गायच्या. अवघ्या 12 वर्षांच्या मुलीचा मनाला भिडणारा आवाज ऐकून एका टीव्ही व रेडिओवरील निर्मात्याने त्यांना पाकिस्तान रेडिओवर ‘लाल मेरी..’ गीतातून संधी दिली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.