आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Seres Kukasamma Pornel Intelligence Ratio Higher Compare Eigntein

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आइन्स्टाइनपेक्षा जास्त बुद्धय़ांकाची शाळकरी सेरिस कुकसम्मी-पार्नेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनमधील एका 11 वर्षांच्या मुलीचा बुद्धय़ांक महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन व स्टीफन हॉकिंग यांच्यापेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. बौद्धिक चाचणीत तिचा बुद्धय़ांक 162 असल्याचे स्पष्ट झाले.

सेरिस कुकसम्मी-पार्नेल असे या शाळकरी मुलीचे नाव आहे. मेन्सा चाचणीत तिने आपल्या वडिलांचा पराभव केला. तिच्या वडिलांना या चाचणीत 142 गुण मिळाले होते. तिने वडिलांना पराभूत करण्यासाठीच चाचणीचे आव्हान घेतले होते. त्यातून तिची क्षमता जगासमोर आली आहे. तिने केवळ वडिलांच्या गुणांपर्यंत मजल मारली नाही तर जगातील बुद्धिवंतांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मानही तिने मिळवला. तिच्या बुद्धिमत्तेने सर्वांनाच चकित केले. तिचे वडील डीन हे मेन्सा समूहाचे सदस्य आहेत. खरे तर मला माझ्या वडिलांना पराभूत करण्याची इच्छा होती. हेच ध्येय ठेवून मी चाचणी दिली होती. परंतु चाचणी एवढय़ा फरकाने त्यांचा पराभव करेल, असे अजिबात वाटले नव्हते, अशी प्रांजळ कबुली चिमुरड्या पार्नेलने दिली. पार्नेल घरात धाकटी आहे. तिला पॉप संगीताची आवड आहे. ती आपल्या मित्रांना संदेश पाठवते. टीव्ही पाहण्याचीही तिला आवड आहे.

मेन्साचे ब्रिटनमध्ये 21 हजार सदस्य आहेत. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी अव्वल बुद्धय़ांक असलेली हा केवळ दोन टक्के समुदाय आहे. आइन्स्टाइनला बुद्धय़ांक 160 एवढा होता, असे मानले जाते.