आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Serial Car Blasts And Firing Killed 86 And 263 People Wounded In Iraq

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बगदादमध्ये दहशतवादी हल्ला; साखळी कार बॉम्ब स्फोटासह गोळीबारात 86 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बगदाद- इराकची राजधानी बगदाद बुधवारी दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या साखळी कार बॉम्ब स्फोटाने हादरले. या स्फोटात 86 ठार झाले असून 263 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर दहशवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एकाच कुटूंबातील सहा जण ठार झाले आहेत. शिया बहुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिस्त्र दियाला येथे ही घटना घडली.

बगदादमध्ये झालेला स्फोट हा 'दहशतवादी हल्ला' असल्याचे गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे. या घटनेनंतर लातीफियामध्ये शस्त्रधारी अज्ञात नागरिकांनी एका सुन्नी कुटूंबियातील सहा सदस्यांची हत्या केली आहे. यापूर्वी ते सुन्नी दहशतवादी असल्याचे समजते. परंतु नंतर त्यांनी अल कायदद्याला विरोध केला होता.

याशिवाय बगदादमधील पश्चिम भागातील कदीमिया येथे दोन स्पोट आणि एक कार ब्लास्ट झाला होता. त्यात पाच जण ठार तर 30 जण जखमी झाले होते. मादेनमध्ये चार जवानांचा मृत्यू झाला. दशतवाद्यांनी गस्त दलाला टार्गेट केले होते.
बगदादमधील स्फोटची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करा...