आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर अब्जांची तजवीज झाली नाही तर आजच संपेल पाकिस्तानातील इंधन स्टॉक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद/ लाहोर - शेजारी राष्ट्र पाकिस्तानमध्ये तेल संकट येऊ घातले आहे. पाकिस्तानमधील परिस्थिती ऐवढी बिकट झाली आहे, की काही शहरांमध्ये फक्त 24 तास पुरेल एवढेच इंधन शिल्लक आहे. सरासरी दर 15 दिवसांनी कच्च्या तेलाचे जहाज बंदरावर येत असते. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून कच्च्या तेलाचे एकही जहाज बंदरावर आले नसल्याचे पाकिस्तान स्टेट ऑइलने (पीएसओ) स्पष्ट केले आहे. कारण निर्यातदारांचे 215 अब्ज रुपयांचे देणे पाकिस्तान सरकारकडे बाकी आहे. इंधन पुरवठा लवकर झाला नाही तर सोमवारपासून अनेक पंप बंद होण्याची शक्यता आहे.
का आली ही परिस्थिती
पाकिस्तानातील पंजाब आणि लाहोरसह काही शहरांना मोठ्या प्रमाणात इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानची खराब आर्थिक परिस्थिती याला कारणीभूत आहे. येथील सरकारी कंपन्या तोट्यात आहेत किंवा त्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानात प्रत्येक दिवशी 11 हजार टन इंधन विक्री होत होती. त्यात वाढ होऊन 15 हजार टनांवर गेली आहे. एका अहवालानूसार गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या मागणीत 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दर महिन्यात पाकिस्तानात सरासरी 3.80 लाख टन इंधनाची गरज असते. यातील 1.40 लाख टन हे रिफायनरीमधून येते. 2.40 लाख टन हे आयात केले जाते. पाकिस्तान स्टेट ऑइलची पाकिस्तानातील तेल बाजारातील हिस्सेदारी 65 टक्के आहे. त्यांची दरवर्षाची उलाढाल 1200 अब्ज रुपये असते. तर, पाकिस्तानातील अरब रिफायनरीचा वाटा 20 टक्के आहे. वीज तुटवड्यामुळे ही रिफायनरी गेल्या काही दिवसांपासून बंद आहे.
निर्यातदार आणि बँकाचा पाकिस्तानवर विश्वास नाही का?
पाकिस्तान स्टेट ऑइल आता ओव्हरड्राफ्ट करण्याच्या स्थितीत नाही. त्यांना तेल उत्पादक देशांचे 215 अब्ज रुपये देणे आहे. देशात ऊर्जा सेक्टरवर 190 अब्ज आणि पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे 12.5 अब्ज रुपये देणे आहे. यामुळे तेल निर्यातदार देश आणि पाकिस्तानातील बँका देखील सरकारी तेल कंपन्यांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. निर्यातदार आणि बँकांचे म्हणणे आहे, की कंपनीने प्रथम मागील देणी चुकती करावी तेव्हाच त्यांना मदत दिली जाईल.

फोटो - लाहोरमधील एका पेट्रोल पंपावर इंधनासाठी रांगेत उभे असलेले लोक
(सौजन्य - द डॉन)