आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sex Gang Gives Drugs And Rape Minor Girls In Britain

ड्रग्‍स देऊन लहान मुलींचे लैंगिक शोषण, इंग्‍लंडमध्‍ये सेक्‍स गँगचे कृत्‍य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- इंग्‍लंडमध्‍ये एक सेक्‍स गँगचे अतिशय संतापजनक कृत्‍य उघडकीस आले आहे. या गँगने लहान मुलींना अंमली पदार्थ देऊन त्‍यांचे अनेक वर्षे लैंगिक शोषण केले. याप्रकरणाची सुनावणी लंडनच्‍या एका न्‍यायालयात सुरु असून अशा खळबळजनक गुन्‍ह्यामुळे इंग्‍लंडची प्रतिमा मलिन झाली आहे.

ऑक्‍सफोर्ड येथील 9 जणांच्‍या गँगवर अतिशय गंभीर आरोप करण्‍यात आले आहेत. त्‍यांनी केलेल्‍या खुलाशानंतर न्‍यायालयही चकित झाले. गँगच्‍या सदस्‍यांनी 11 वर्षांपर्यंत वयाच्‍या 6 मुलींवर जवळपास 8 वर्षांपर्यंत अंमली पदार्थ देऊन बलात्‍कार केला. त्‍यातील काही मुलींना बाल वेश्‍याप्रमाणे विकण्‍यात आले. तर काहींचा देशभर देहविक्रय व्‍यापार करण्‍यात आला.