आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीरियात आता \'सेक्स जिहाद\'; ट्‍यूनीशियन तरुणी भागवताहेत सैनिकांची शारीरिक भूक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्यूनिश- गृहयुद्धात होरपळून ‍निघालेल्या सीरियात आता 'सेक्स जिहाद'चे संकट उभे ठाकले आहे. ‍सीरियात लढणार्‍या सैनिकांची शा‍रीरिक भूक भागविण्यासाठी शेजारील देशातील तरुणी तसेच महिला मोठ्या संख्येने सीरियात दाखल झाल्या आहेत. या तरुणी ट्यूनीशियातील असल्याचा धक्कादायक खुलासा खुद्द ट्यूनीशियाचे गृहमंत्री लोफी बेन यांनी केला आहे.

सीरियातील बंडखोरांची शारीरिक भूक शमवल्यानंतर तरुणी आणि महिला गर्भवती होऊन मायदेशात परततात. एक तरुणी अथवा महिला 20, 30 नव्हे तर तब्बल 100 पुरुषांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत असल्याचे लोफी बेन यांनी विधानसभा सदस्यांना सांगितले. 'जिहाद- अल-‍निकाह'च्या (सेक्शुअल होली वॉर) नावाखाली याला अधिकृत मान्यता मिळवण्याचा या महिलांचा प्रयत्न सुरु आहे.

'जिहाद- अल- निकाह'द्वारा कोणत्याही महिलेला विवाहोत्तर शारीरिक संबंध करण्यास तसेच एकापेक्षा जास्त जोडीदारांसोबत रात्र घालवण्याचे स्वातंत्र प्रदान केले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुन्नी कट्टरपंथी मुस्लिम समुदायाने यास प्रवित्र युद्ध म्हणून मान्यता दिली आहे. परंतु ट्युनीशियामधून आतापर्यंत किती महिला सेक्स जिहादसाठी गेल्या आहेत, याबाबत बेन यांनी सांगितले नाही. मीडियाच्या एका अहवालानुसार जवळपास शंभर महिला या कामासाठी सीरियात गेल्या असल्याचे कळते.