आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लादेनशी \'संग\' करण्यावरून त्याच्या बायकांमध्ये कायम होत असे तू तू मैं मै

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहशतवादाचा प्रमुख चेहरा, अलकायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या हत्येला दोन वर्षे होऊन गेली आहेत. या दोन वर्षात लादेन आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक जाणून घेण्यास जगभरातील लोकांनी पसंती दर्शवली आहे. त्याच्या बाबतीतील अनेक गोष्टी मात्र आजही रहस्यच बनून राहील्या आहेत.

यात प्रामुख्याने त्याच्या असलेल्या अनेक बायका आणि त्यांची होणारी भांडणे आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण, लादेन कोणाकडे जास्त वेळ राहातो यावरुन त्यांच्यात खडाजंगी होत होती. याचा खुलासा खुद्द लादेनची पहिली बायको खैरिया हिने केला होता. लादेन सर्वात लहान बायको अमाल जवळ जास्त राहातो याबद्दल तिने अनेकदा रोष व्यक्त केला होता. यावरून खैरिया आणि अमाल यांच्यात नेहमी भांडणे होत होती.