आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन आठवडे महिलेला बंदिस्त ठेवून केले अत्याचार; बुट, बेल्टने करीत होता मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्कमध्ये एका युवकाला एका महिलेच्या लैंगिक शोषण आणि अपहरणाच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. एवढेच नाही तर, महिलेच्या लैंगिक शोषणाची माहिती तो एफबीआय एजंटला वेळोवेळी देत होता. मात्र, त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही, यामुळे एफबीआयच्या अधिका-यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.

19 वर्षीय ब्रेंडन टॉड याने कॅलिफॉर्नियामधून महिलेचे अपहरण केले होते. तिला तो न्यूयॉर्कमधील नेपल्स येथे घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केले. विशेष म्हणजे, टॉड ही सर्व माहिती एफबीआय एजंट बॅरी क्रॉच यांना वेळोवेळी देत होता. तो देहव्यापराच्या धंद्यात असल्याचेही त्याने सांगितले होते. असे असतानाही एफबीआय एजंटने त्याच्याविरोधात कोणतीच कारवाई केली नाही.

एक दिवस अस्थम्याचा अटॅक आल्याचे नाटक करुन महिलेने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. तेथून तिने शिताफीने स्वतःची सुटका करुन घेतली आणि बॉयफ्रेंडसोबत तिने फ्लोरिडामध्ये पलायन केले. यावेळीही टॉडने महिला पळून गेल्याची माहिती क्रॉच यांना दिली. माझे तिच्यावर प्रेम आहे, तिला शोधण्यात माझी मदत करा अशी याचनाही त्याने केली. नऊ जुलै रोजी क्रॉच यांनी कोर्टात शपथपत्र लिहून दिल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. लैंगिक शोषण, अपहरण आणि महिलेला डांबून ठेवल्याच्या आरोपात टॉडला अजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते.