आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sexual Exploitation From Childhood Anushka Sankar's History

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालपणी लैंगिक शोषण ; अनुष्का शंकरची आपबीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- प्रसिद्ध सतारवादक दिवंगत पंडित रविशंकर यांची कन्या अनुष्का शंकर हिने लहानपणी आपलेही लैंगिक शोषण झाल्याचा गौप्यस्फोट केला आहे. आई-वडिलांचा खूप विश्वास असलेल्या व्यक्तीनेच दीर्घकाळ शोषण केल्याचे तिने म्हटले आहे.

‘वन बिलियन रायझिंग’ या अमेरिकी संस्थेच्या लैंगिक शोषणाविरुद्ध अभियानातील व्हिडिओमध्ये अनुष्काने गुदरलेला प्रसंग कथन केला आहे. अनुष्काने म्हणते, ‘लहान असताना अनेक दिवस मला शारीरिक, मानसिक छळाला सामोरे जावे लागले. गर्दीत गर्दीतील छेडछाडीची मीही शिकार ठरले आहे. त्यामुळे महिलांचे दु:ख मी समजू शकते. आता या त्रासातून जावे लागलेल्या महिला व मुलींसाठी काम करू इच्छिते.’ पुढे अनुष्का म्हणते की, ‘आजही घराबाहेर पडताना मला धास्ती वाटते. अनोळखी पुरुषांची भीती वाटते.’ दिल्लीतील पीडित तरुणीच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे अभियान सुरू करण्यात आले आहे.