आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Mehmood Qureshi Accidentally Steps Into Indian Territory

पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांनी केला भारतीय सीमेत प्रवेश; रेंजरने वेळीच केले सावध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी गुरुवारी (6 नोव्हेंबर) अनावधानाने भारतीय सीमेत प्रवेश केला. कुरेशी वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी रेंजर्सचे मनोध्येर्य वाढविण्यासाठी आले असता ही घटना घडली.

मिळालेली माहिती अशी की, वाघा बॉर्डरवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर पाकिस्तान तहरीक-ए- इंसाफ पक्षांचे उपाध्यक्ष कुरेशी यांनी गुरुवारी पाक सैन्यांची भेट घेतली. गत आठवड्यात वाघा बॉर्डरवर दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला घडवून आणला होता. 60 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यु झाला होता तर शेकडो लोक जखमी झाले होते.

कुरेशी झिरो लाइनची पाहाणी करताना भारतीय अधिकार्‍यांशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आले असता त्यांनी अनावधानाने पाकची सीमा ओलांडत भारतीय सीमेत प्रवेश केला. वेळीच एका रेंजरने कुरेशी यांना सावध केले आणि त्यांना परत बोलावले.

नंतर, कुरेशी यांनी परिस्थिती शांततेने हाताळली. कुरेशी गमतीने म्हणाले, मी अनावधानाने विना व्हिजा भारतीय सीमेत प्रवेश केला. मात्र, एक पाऊल पाकिस्तानात होते. दरम्यान, एखाद्या सामान्य व्यक्तीने जर सीमा ओलांडली असती तर त्याला तडकाफडकी अटक करण्यात आले असते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, घटनेचा व्हिडिओ...