आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shakespeare Drama To Be Digitized By Oxford University

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेक्सपिअर नाट्यकृती डिजिटल स्वरूपात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- विल्यम शेक्सपिअरची नाट्यकृती लवकरच डिजिटाइझ स्वरूपात वाचकांना इंटरनेटवर उपलब्ध होणार आहे. 1623 मधील या नाट्याच्या पहिल्या आवृत्तीला फर्स्ट फोलिओ नावाने ओळखले जाते. हे शिवधनुष्य आॅक्सफर्ड विद्यापीठाने उचलले असून त्यासाठी निधी उभारणीचे काम सुरू आहे.
या पुस्तकाला त्या काळी केलेले चामड्याचे आवरण आहे. त्याचबरोबर जुन्या पद्धतीचे कामही त्यावर दिसून येते. या पुस्तकाच्या संवर्धनाची मोहीम आॅक्सफर्ड विद्यापीठाच्या बॉडलिएन ग्रंथालयाने हाती घेतली आहे. त्याला ‘प्रिंट फॉर शेक्सपिअर’ असे नाव देण्यात आले आहे.
या आवृत्तीचे डिजिटायझेशनचे काम करताना संपूर्ण पानांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे फर्स्ट फोलिओच्या स्थितीमध्ये काही प्रमाणात सुधारणा करता येणार आहे. ही मूळ आवृत्तींपैकी एक आवृत्ती आहे. त्यामुळे तिचे महत्त्व मोठे आहे. फर्स्ट फोलिओ ही शेक्सपिअरच्या नाटकांचे संकलन करण्यात आलेली पहिली आवृत्ती आहे. ही आवृत्ती या महान लेखकाच्या मृत्यूनंतर सात वर्षांनी प्रकाशित करण्यात आली होती. ‘इंग्रजीतील नाटकांचे पहिले संकलित साहित्य’ असेही फर्स्ट फोलिओचे महत्त्व आहे. बॉडलिएन ग्रंथालयात असलेली ही आवृत्ती आणखी एका अर्थाने एकमेव म्हणावी लागते. कारण मूळ आवृत्तीचा गेल्या चार शतकांत कोणत्याही प्रकारे संवर्धन व संरक्षणाचा विचार झालेला नाही. ग्रंथालयात या आवृत्तीला विशेष स्थान आहे. शेक्सपिअरचा काळ दर्शवणारी या पुस्तकाची पाने आहेत. त्यामुळे ती अस्सल तर आहेतच, त्याचबरोबर ग्रंथालयाने ती एवढे वर्षे कशी जपली असतील, याचाही नमुना ठरते, असे ग्रंथपाल डॉ. साराह थॉमस यांनी सांगितले. दुसरीकडे पाश्चात्त्य जगातील धर्मनिरपेक्ष ग्रंथांमध्ये शेक्सपिअरच्या या पुस्तकाचा समावेश होतो. या पुस्तकाचे डिजिटायझेशनचे काम म्हणजे या चमत्कारी इतिहासाचा महान प्रकल्प असल्याची भावना आॅक्सफर्ड विद्यापीठातील प्रोफेसर जॉनथन बेट यांनी व्यक्त केल्या.
जीर्ण पाने : फर्स्ट फोलिओची मूळ आवृत्ती पाहिल्यानंतर ती जीर्ण झाल्याचे जाणवते. या पुस्तकाच्या पाना-पानांवर वर्षानुवर्षे अनेकांचे हात फिरले आहेत. त्यामुळे पानांची झीज झाली आहे.